आज सकाळी उठलोय.
बरच काही हरवलेलं आहे
सापडत नाहीय
असं काहीसं झालंय.
हरवल्याचं दुःखच नाहीये नुसतं.
वेदनांच्या जवळ जाणारं वर्तुळ
तुटत नाहीये ते.
आणि तोडणारही नाहीय.
ते विरघळेल कालौघात.
विरघळताना पाहिलय बऱ्याच जणांचं.
माझंही काय दुसरं होणारेय!
तेच! तेच!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा