शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

🌴🌴🌴🌴🌴🌴
*नारळाच्या शेंड्या कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन किंवा खलबत्त्यात कुटून कोकोपीट मिळवणे हे त्रासाचे व कोकोपीटच्या किमतीच्या तुलनेत कष्टाचे काम होऊन बसते.*
🌴🌴🌴🌴🌴🌴
*यापेक्षा नारळाच्या शेंड्या हाताने थोड्या कमी रुंदीच्या करून चिखलाच्या गाऱ्यात दोन दिवस मुरवायला ठेवाव्यात. नन्तर बाहेर काढून किंचित ओल राहील इतपत सुकवाव्यात. कुंड्या भरताना तळाशी विटांचे तुकडे टाकल्यावर या अर्धवट वाळलेल्या शेंड्यांचा थर देत यावे. नारळाच्या शेंड्याच्या दोन थरांमध्ये शेणखत / कम्पोस्ट/गांडूळखत यापैकी एक किंवा उपलब्ध असतील तर सर्व खते यांचा पातळ थर असावा.दोन थरानंतर निमपेंड ही चमचाभर टाकावी.*
🌴🌴🌴🌴🌴🌴
*शेंड्यामध्ये अंतर्भूत असणारे कोकोपीट शेंड्यात असले काय किंवा पीठ स्वरूपात असले काय, कुंडीत त्याचे पाणी धारण करण्याचे काम करतच असते.*
 *उलट शेंड्या वापरल्याने मातीत आपोआप एअर पॉकेट्स तयार होऊन मुळांची वाढ चांगली होते.*
*कुंडीतील मातीची उंची कचरा कुजून कमी होते.  त्याचे करेक्शन करण्यासाठी ( पॉटमिक्स ची कुंडीतील उंची वाढवण्यासाठी) रीपॉट करताना या चिखलात घोळवून सुकवलेल्या नारळाच्या शेंड्या तळात उंची किती वाढवायची त्या प्रमाणात वापराव्या. व नन्तर कुंडीतील पाण्याचा योग्य  निचरा होण्यासाठीही याचा उपयोग होतोच* !
©प्रमोद गानु.
🌸🌺🌸🌺🌸🌺🌸

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा